Thursday, March 13, 2025

आजऱ्याला दुसऱ्या, चौथ्या मंगळवारी आरटीओ कॅम्प

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा तालुक्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी आरटीओ कॅम्प आयोजित केला जाणार आहे. मंगळवार दि. ११ मार्च पासून याची सुरूवात करण्यात आली. पहिलाच कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह परीसरात आयोजित करण्यात आला होता. मंगळवारच्या आजऱ्यातील पहिल्याच कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी आजरा तालुक्यातील आरटीओशी कामांसाठी शहरासह नागरीकांना संबंधित सर्वच गडहिंग्लज किंवा कोल्हापूर येथे जावे लागत होते. आरटीओ विभागाने आजरा येथे कॅम्प सुरू केल्यामुळे आजरा तालुक्यातील नागरीकांची सोय होणार आहे. वाहन चालविण्याचा परवाना काढणे, परवाना नूतणीकरण, वाहन पासिंग यासह आरटीओसी संबंधित सर्वच कामे याठिकाणी होणार असल्याने आजरा तालुक्यातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...