Monday, March 17, 2025

आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगाराची संधी या विषयावर व्याख्यान

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा महाविद्यालय, आजरा अर्थशास्त्र विभाग आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने "फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम“ अंतर्गत अर्थशास्त्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर प्रा. डॉ. काशिनाथ तनंगे  (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) व प्रा. डॉ. डी.जी. चिघळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.  यामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती किती मोठी आहे.  बँका, व्यापार, कृषी , शेअर मार्केट अशा अनेक क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्राला अमूल्य महत्व प्राप्त झाले आहे. हे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना सांगितले.  सध्याची शिक्षण व्यवस्था, मोबाईलचे व्यसन, यावर भाष्य करताना वाचन संस्कृती कशी कमी होत आहे हे  विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अर्थशास्त्र विभागांतर्गत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. एन. सादळे होते. या कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. महेंद्र जाधव यांनी केले. आभार प्रा. दिपाली कांबळे यांनी मानले.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...