Monday, March 17, 2025

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आजऱ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत पार पडतो. यावर्षी हा बलिदान मास 28 फेब्रुवारी ते 29 मार्च 2025 अखेर होत आहे. या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा विभाग यांच्यातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे अनमोल कामत यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय व संत गोरा कुंभार यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रेरणा मंत्राने रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यावेळी तब्बल 103 धारकऱ्यांनी रक्तदान यज्ञांमध्ये सहभाग नोंदवला. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेनुसार संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शिवशंभू रक्तगटाची पिढी घडवणे, हिंदू समाज हिंदू राष्ट्र व हिंदू धर्म यांचे एकत्रिकरण करून संरक्षण करणे, हेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय असल्याचे यावेळी संयोजकांनी सांगितले. या रक्तदान शिबिरासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व कुंभार समाज संस्था आजरा यांचे सहकार्य लाभले. ध्येयमंत्राने रक्तदान शिबिराची सांगता झाली.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...