पुणे, न्यूजसेवा :
राज्य सरकारने गायीच्या दुधाला घोषित केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपयांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देय अनुदानासाठी ३३९ कोटी १५ लाख रुपये दुग्धव्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे सोमवारपासून (दि. १७) हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. योजनेंतर्गत सुमारे साडेसात लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
राज्य सरकारने २९ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दूध अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिलिटरला ७ रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. याची अंमलबजावणी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि सहकार विभागामार्फत संयुक्तरीत्या होत आहे.
दुधाचे अनुदान देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ७५९ कोटींची तरतूद आली. त्यापैकी ३३९.१५ कोटी अनुदान दुग्ध विभागास प्राप्त झाले. त्यानुसार सुरुवातीच्या योजनेतील प्रतिलिटरला पाच रुपये घोषित अनुदान योजनेतील अनुदानाअभावी शिल्लक प्रस्ताव आणि सात रुपये प्रतिलिटर अनुदान योजनेंतर्गतचे प्रस्ताव मिळून हे अनुदान वितरणाची कार्यवाही सोमवारपासून सुरू होईल. प्राप्त अनुदान रकमेचा खर्च झाल्यानंतर उर्वरित सुमारे ४२० कोटी अनुदानाची रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचेही मोहोड यांनी सांगितले.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment