Thursday, March 20, 2025

जिल्हा परिषदेची जिल्हास्तरीय बदली प्रक्रिया ५ मेपासून; १२ एप्रिल ते २५ मेपर्यंत चालणार प्रक्रिया

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आता प्रशासकीय बदल्यांचे वेध लागले आहेत. १२ एप्रिल २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, तालुका पातळीवरील प्रक्रिया २५ मेपर्यंत चालणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना १५ मार्चला परिपत्रक काढले आहे.

त्यानुसार जिल्हास्तरीय बदल्यांसाठी खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांनी १२ एप्रिलपर्यंत संवर्गनिहाय वास्तव्य ज्येष्ठता याद्या तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करावयाच्या आहेत. १७ एप्रिलला याद्या प्रसिद्ध करावयाच्या असून, १८ ते २७एप्रिल या कालावधीत आक्षेप व सूचना मागविण्यात येणार आहेत. २ मे रोजी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ५ ते १५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदली प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने तालुकास्तरीय बदल्यांसाठी १२ एप्रिलपर्यंत ज्येष्ठता यादी तयार करणे, १३ ते २२ एप्रिल या कालावधीत हरकती मागविणे आणि ३० एप्रिलला अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर १६ ते २५ मे या कालावधीत तालुकास्तरीय बदली प्रक्रिया होणार आहे. या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही अपेक्षित असून, याची जबाबदारी खातेप्रमुख गटविकास अधिकाऱ्यांची असून, यामध्ये अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
=================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...