आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मलिग्रे (ता. आजरा) या गावाचे आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव योजना अंतर्गत (स्मार्ट ग्राम) तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मुल्यमापन करणे करीता, पन्हाळा तालूका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती सोनाली माडकर, विस्तार अधिकारी भोसले व आर. एम. तळपे याच्या समितीने पहाणी करून मुल्यमापन केले. या समितीचे गावच्या सीमेवर स्वागत करून, महिला लेझीम पथकाने आपली कला सादर केली.
गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा जोतीबा फुले विद्या मंदिर, गावातील सर्व मंदिरे, वाचनालय, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सांडपाण्याचे व गटार स्वच्छता, पानंद रस्ता, ग्रामपंचायत कामकाजचे मुल्यमापन केले. यावेळी माजी सरपंच समिर पारदे यांनी प्रास्ताविकात गावातील विविध उपक्रम व संस्था संघटनाची माहिती दिली. सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करणेत आले. ग्रामपंचायत अधिकारी धनाजी पाटील यांनी गावातील विविध उपक्रम व फोटोग्राफी त्या अनुषंगाने कागदपत्र कमिटीला सादर केली. यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती सोनाली माडकर यांनी लोकांनी केलेले उत्साही स्वागत व उपक्रमांची नोंद घेत, ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी पंचायत समिती आजरा ग्रामविस्तार अधिकारी पी. टी. कुंभार, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा तर्डेकर, शोभा जाधव, कल्पना बुगडे, रेश्मा बुगडे, राजू नावलगी, सचिन सावंत, पोलिस पाटील मोहन सावंत यांचे सह मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उपसरपंच चाळू केंगारे यांनी मानले.
================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment