Thursday, March 20, 2025

आजरा शहर पाणी पुरवठा योजनेची होणार चौकशी; प्रांताधिकारी यांच्याकडून नगरपंचायतीला पत्र

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या वतीने शहरात सुरु असलेल्या अंतर्गत घरगुती पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमुना दर्जा पाणी (Urgent Sample Quality Check) करणे व इतर चालू असलेल्या कामाबाबत चौकशीचे आदेश भुदरगड-आजराचे प्रांताधिकारी हरीश सूळ यांनी आजरा नगरपंचायतीला दिले आहेत.

 आजऱ्यातील आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा नळपाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिले होते. या अनुषंगाने याची दखल घेत प्रांताधिकारी सूळ यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आदेश देत आजरा शहर अंतर्गत पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमूना दर्जा तपासणी (Urgent Sample Quality Check) करावी व इतर चालू असलेल्या कामाबाबत चौकशी करुन आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीला आपल्या स्तरावर कळवावे व कार्यवाहीचा अहवाल प्रांत कार्यालयाला सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.
==============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...