Monday, March 10, 2025

हारूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ग्रुप ग्रामपंचायत कानोली /हारूर (ता. आजरा) यांच्या वतीने हारूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या. स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर  यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उत्पादन शुल्क अधिकारी अक्षता कुपटे होत्या.

यावेळी बोलताना  कुपटे यांनी महिलांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या बाबत माहिती दिली. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगितले. ग्रामीण भागातील मुलींनी शिकून आई वडिलांचे नांव उज्वल करावे असे अहवान केले. यावेळी कृषी सहायक मनीषा पाटील यांनी कृषी विभागामार्फत महिलांनी करावयाचे उद्योग याबाबत माहिती दिली, यावेळी गावातील कर्तृत्वमान महिलांचा सन्मान करण्यात आला. हास्यकलाकार आत्माराम पाटील यांनी आपली कला सादर केली, कार्यक्रमास  कृषी सहायक दादू ऐनापुरे ग्रा. प. सदस्या माया लोहार, दिपाली सुतार, सारिका भोसले, वासू पाटील, मिलिंद पालकर संतोष सावंत, नितीन घेवडे, सुनिल लोहार, परशराम तिप्पट, सुनिल चौगुले मनोहर सुतार यांच्यासह अंगणवाडी सेविका संजीवनी कदम, मदतनीस अनिता सावंत यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार सुभाष पाटील यांनी मानले.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...