Tuesday, March 11, 2025

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार कॉ. संपत देसाई यांना जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार धरणग्रस्त चळवळीचे नेते कॉ. संपत देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्यावतीने हा पुरस्कार सुरू केला आहे. जेष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांनी दिलेल्या दोन लाख रुपये रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार यावर्षी पासून सुरू केला आहे. रुपये ११ हजार, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवार दि १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी शिवीमच्या अधिवेशनात हा पुरस्कार कॉ. देसाई यांना दिला जाणार आहे. कॉ. संपत देसाई यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आणि धरणग्रस्त कष्टकऱ्यांच्या साठी केलेल्या कामाची नोंद म्हणून हा पहिला पुरस्कार त्यांना दिला जात आहे.
=================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...