आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मलिग्रे (ता. आजरा) येथे संविधानाच्या सन्मानार्थ ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती मोहीम कार्यक्रम, पोस्टर्स प्रदर्शन व महिलांच्यासाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धा अशारितीने महिला दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी संविधान सन्मानासाठी महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या न्याय हक्कासाठी या विषयावर संजय घाटगे, संग्राम सावंत, सरपंच शारदा गुरव व मंगलताई कांबळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर शाळेतील सुकन्या बुगडे, दूर्वा कागिनकर व दुर्वा बुगडे या मुलींनी भाषणे केली. यावेळी शाळेच्या आवारामध्ये आम्ही भारतीय लोक अभियान व मासूम संविधान फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या मूल्यांची माहिती देणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन शाळेच्या आवारात लावण्यात आले होते.
त्याचबरोबर महिला दिनानिमित्त महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये अंगणवाडी सेविकांनी खूप मेहनत घेतली होती. यावेळी विशेष सत्कार हा महिला जागतिक दिनानिमित्त विधवा महिलेचा सन्मान करणारा केला. यामध्ये शितल बुगडे यांनी त्यांचे पती वारल्यानंतर कुंकू दागिने व सुहासिनीचा मान न सोडता कायम त्यांनी ठेवला. तसा ठराव गावामध्ये करण्यात आला. हा एक क्रांतिकारी बद्दल झाल्याबद्दल त्यांचा विषय सत्कार सर्वांच्या वतीने घेण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त मलिग्रे गावात महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिरात सरपंच शारदा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच चालू केंगारे, संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते संग्राम सावंत, सदस्या शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, कल्पना बुगडे, महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या नेत्या मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय घाटगे, बाळू कांबळे, शिवाजी भुगुत्रे, संजय कांबळे,सचिन लोहार, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे, माजी सरपंच अशोक शिंदे, मुख्याध्यापक मनीषा सुतार, शिक्षिका कल्पना कोरवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता कागिनकर, उपाध्यक्ष पुजा पन्हाळकर, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, अपूर्वा देशपांडे, नंदा पवार व लोहार मॅडम, मदतनीस नंदा बुगडे, शितल बुगडे व शोभा बुगडे यांच्यासह सविधान गटातील महिला व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
संविधान संवर्धन चळवळ, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ,आम्ही भारतीय लोक अभियान, राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, मुक्ती संघर्ष समिती,महात्मा जोतिबा फुले विद्यामंदिर व अंगणवाडी आणि ग्रामस्थ,मलिग्रे यांच्या वतीने मलिग्रे येते संविधानाच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीच्या ओवीने मंगल कांबळे यांनी केली. कार्यक्रमाचा शेवट शकुंतला बोरनाक यांनी तुकोबारायांच्या अभंग गाऊन केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा सुतार यांनी तर आभार प्रदर्शन बाळू कांबळे यांनी केले.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment