कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादकांच्या जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘आबाजीश्री’ स्पर्धा आयोजित केली आहे.
सदरची ‘आबाजीश्री’ स्पर्धा दि. ११ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक यांनी आपल्या संस्थेच्या लेटर हेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, उदगाव व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि.१० मार्च २०२५ रोजी अखेर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘आबाजीश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे :- म्हैस विभाग : प्रथम क्रमांक - ५१ हजार, द्वितीय क्रमांक - ३५ हजार, तृतीय क्रमांक - २५ हजार.
गाय विभाग : प्रथम क्रमांक - ५१ हजार, द्वितीय क्रमांक - ३५ हजार, तृतीय क्रमांक - २५ हजार.
स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत आयोजित केलेल्या या ‘आबाजीश्री’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्या वतीने करण्यात आहे.
=====================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment