Monday, March 3, 2025

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जाहीर, मार्चचाही हप्ता लवकरच...?

मुंबई, वृत्तसंस्था :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्चच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर अनेक पात्र महिला फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लक्ष ठेवून होत्या. मात्र, महिना संपून दुसरा महिना उजाडला तरीही फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीवर आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं असून मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही सुतोवाच केले आहे. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्या विधानभवनात आलेल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याची माहिती दिल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आदिती तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विभागाच्या वतीने निधी उपलब्ध केला जाईल; निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ता दिला जाईल.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...