साडेसात एचपी वीज बीले शेतकऱ्यांचे माफ करावे, कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा, सोलार सक्ती करु नये, प्री पेड पद्धत रद्द करावी या मागण्यांसाठी आजरा महाविकास आघाडीच्या वतीने आजऱ्यातील छत्रपती संभाजी चौकात वीज बीलांची होळी करत भाजप सरकारच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन केले.
निवडून येण्याआधी घोषणांचा पाऊस पडणाऱ्या भाजप सरकारने निवडून आल्यावर जनतेच्या अपेक्षा भंग केल्या आहेत.फडणवीसांचे सरकार नसून हे सरकार फसवणूकींचे आहे.राज्यात असंतोष व निंदनीय घटना घडत आहेत. शिवरायांच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई होत नाही, पुण्यात युवतीवर बलात्कार झाला. आरोपी अद्याप सापडत नाही. शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. अदानी अंबानींच्या घशात राज्याला ढकलत आहेत असे मत कॉ. संपत देसाई, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे, तालुकाध्यक्ष युवराज पोवार, कॉ. शांताराम पाटील, नारायण भडांगे यांनी व्यक्त केले. या आंदोलनात संभाजी पाटील, ओमकार माद्याळकर,संजय सावंत, संकेत सावंत, विक्रम देसाई, प्रकाश मोरुसकर, दिनेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
==================
No comments:
Post a Comment