Saturday, January 18, 2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे उपक्रम संपन्न

गारगोटी, वृत्तसेवा :
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचे उद्घाटन आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अमर चौगले यांच्या हस्ते झाले. यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथवाचन व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे एक तास वाचन केले. तसेच वाचनानंतर प्रत्येक मुलांनी त्यामधील सारांश एक एकमेकांबरोबर कथन केले. या उपक्रमामुळे मुलांच्या मध्ये विशेष आनंद दिसून आला.
वाचन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे, ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ अमर चौगले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे अयोजन कॉलेजचे ग्रंथपाल प्रवीण यादव यानी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अर्जुन आबिटकर व प्राचार्य अमर चौगुले, धीरज देसाई व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.  संस्थेचे संस्थापक अर्जुन आबिटकर यांनी  वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...