Saturday, December 7, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-धर्मापेक्षा ज्ञानाला अधिक महत्त्व दिले : गौतम कांबळे, आजरा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-धर्मापेक्षा ज्ञानाला अधिक महत्त्व दिले : गौतम कांबळे, आजरा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा 
 आजरा वृत्तसेवा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-धर्मापेक्षा ज्ञानाला अधिक महत्त्व दिले. आधुनिक भारताच्या विकासासाठी त्यांनी जलतज्ज्ञ, शेतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, राजनीती तज्ज्ञ म्हणून त्यांची भूमिका संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यामुळे उदयोन्मुख भारताच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे, असे मत प्रमुख वक्ते मा. गौतम कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आजरा महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य दिलीप संकपाळ म्हणाले, शिक्षणाशिवाय समाजाला तरणोपाय नाही. तसेच आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या अंतःकरणाबरोबरच डोक्यात ठेवणेसुद्धा महत्त्वाचे आहे. हक्क व कर्तव्य मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  केल्याचे उद्गार त्यांनी या निमित्ताने काढले. यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. बी. पवार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रा. विठ्ठल हाक्के यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास डॉ. अविनाश वर्धन, बाळासाहेब कांबळे, प्रा. मुंढे आदींसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...