Sunday, December 8, 2024

आजरा शहरातील असुविधाबाबत अन्याय निवारण समितीचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

आजरा शहरातील असुविधाबाबत अन्याय निवारण समितीचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना साकडे 
आजरा, वृत्तसेवा :

आजरा शहरात गेल्या दोन वर्षापासून एक दिवस आठ मिळणारे पाणी, उखडलेले रस्ते, करोडो रुपये खर्चून आणलेली पाणी योजना रेंगाळलेले काम, सुरू होण्यापूर्वीच बंद पडलेला घनकचरा प्रक्रिया उद्योग, निकृष्ट दर्जाचे बांधलेले गटर्स व शहरातील असुविधांबद्दल अन्याय निवारण समितीने थेट जिल्हाधिकारी यांच्या दरबारात ऑनलाइन निवेदन देऊन न्याय मागितला आहे. निवेदनाच्या प्रती आजरा नगरपंचायत, तहसिलदार प्रांताधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
         
आजरा शहरातील रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे पण कामाच्या कोणत्याही निविदा प्रसिद्ध न करता फक्त कार्यालयीन लागणारी कागदपत्रे तयार करून मर्जीतील ठेकेदार व उपठेकेदारामार्फत करून घेतली जात आहेत. त्यामुळे सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. नळपाणी पुरवठा योजनेची सद्यस्थिती, शिव कॉलनीतील सांडपाण्याची व्यवस्था, गटार व रस्त्याची कामे निविदा काढून नोंदणीकृत ठेकेदारामार्फत करून घेणे व त्याचा नकाशा सोबत ठेवणे, भारतनगरमधील अर्धवट गटर व पाणी गळती, चाफेगल्लीतील दूध डेअरी पाठीमागील अडविलेला रस्ता खुला करणे, वाणी गल्लीच्या पाठीमागील गटार स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा करणे, पाणीपुरवठा ठेकेदारासोबत बैठक लावणे, समर्थ कॉलनीतील चुकीची बांधलेली गटर काढून नवीन गटर बांधकाम करणे, बळीराम देसाई नगरातील पाणीपुरवठा सुरळीत करून गटर व रस्ते पूर्ण करणे,  रवळनाथ कॉलनीतील अंगणवाडी शेजारील चोरीला गेलेल्या बोअरवेलचा तपास करणे, आपटे कॉलनी व गांधीनगर रस्त्यावरील मंजीरीच्या ठिकाणी वीजेचे खांब उभा करून लाईटची व्यवस्था करणे यासह विविध ठिकाणचे गटर्स, रस्ते, पाणी या नागरी सुविधा देण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.‌ याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा पुढील कार्यवाही करणे भाग पडेल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर परशुराम बामणे, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव यासह नागरिकांच्या सह्या आहेत.
===============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...