Thursday, November 7, 2024

आमदार प्रकाश आबिटकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा : गोकुळ अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे

आमदार प्रकाश आबिटकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा : गोकुळ अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे
अर्जुनवाडा, वृत्तसेवा

आमदारकीच्या 10 वर्षाच्या कालावधीत माजी आमदार के. पी. पाटील राधानगरी मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ 10 वर्ष पाठीमागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केलं आहे. त्यामुळे या निवडणूकीत आमदार प्रकाश आबिटकर यांचा विजय निश्चित असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केला. ते तुरंबे (ता. राधानगरी) येथे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना डोंगळे म्हणाले की, माजी आमदार के. पी. पाटील यांचा 10 वर्षाचा आमदारकीचा कालावधी लोकांनी पाहिलेला आहे. या कालावधीत ते मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ 10 वर्षे पाठीमागे गेला आहे. निवडणूकीत कोणत्याही आमीषाला बळी पडू नका. मतदार संघाचा विकास करणाऱ्या माणसाला साथ देऊया. निवडणूकीत उच्चांकी मतांनी आमदार आबिटकर निवडून देऊन मतदार संघाचे अपुर्ण राहिलेले मंत्री पदाचे स्वप्न साकार करूया यामध्ये राधानगरीकरांचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना जालिंदर पाटील म्हणाले की, आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे जाधव गुरूजी काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसरे गुरूजी आपल्या सोबत आलेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मी आणि माझा मुलगा या राजकारणाला विरोध करण्याचे सामर्थ्य आमदार आबिटकर यांनी दाखविलेले आहे. प्रस्थापितांनी उभे केलेले चक्रव्युव्ह भेदून आमदार प्रकाश आबिटकर मोठ्या मताधिक्यानी विजयी करून राधानगरीची जनता पुन्हा वाजत-गाजत विधानसभेत पाठविणार असल्याचे सांगितले.

आजरा जिल्हा परिषद मतदार संघातून मताधिक्य देणार : अशोकअण्णा चराटी
मंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नामुळे  आजरा शहराला नगरपंचायत मंजूर झाली. आजरा शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचबरोबर आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. एकीकडे मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आमदार आबिटकर तर याउलट दुसरीकडे माजी आमदार के.पी.पाटील मतदार संघात फिरकतच नव्हते असे चित्र होते. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील जनता आमदार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. 

चौकट....
 राधानगरीतील विविध संघटनांचा पाठींबा
राधानगरी तालुका गवई गटाचे उपाध्यक्ष सातापा कांबळे, तालुका संघटक रविंद्र कांबळे, जिल्हा संघटक विलास कांबळे, विश्वास कांबळे-दुर्गमानवाड, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सरवडे येथील अरुण साठे गटाने जाहीर पाठींबा दिला.
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

शूरवीरांच्या देशसेवेचा कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे; निधी संकलन शुभारंभ, सशस्त्र सेना ध्वजदिन, विजय दिवस साजरा

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : शूरवीरांच्या देशसेवेचा कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे. त्यांच्या साहस, त्याग आणि राष्ट्रनिष्ठ...