राधानगरी विधानसभा मतदारसंघातून सात उमेदवार रिंगणात, प्रमुख उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेला अपक्ष उमेदवार
राधानगरी, वृत्तसेवा :
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राधानगरी विधानसभा मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांच्यात चुरशीचा तिरंगी सामना होणार आहे.
छाननी नंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात एकूण 14 अर्ज शिल्लक होते. सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर सात जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये चार राजकीय पक्षांचे तर तीन अपक्ष रिंगणात आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रिंगणातील उमेदवार पुढील प्रमाणे : प्रकाश आबिटकर (शिवसेना), के. पी. पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), पांडुरंग कांबळे (बहुजन समाज पार्टी), युवराज येडुरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), ए. वाय. पाटील (अपक्ष), कुदरतुल्ला लतीफ (अपक्ष), के. पी. पाटील (अपक्ष)
====================
No comments:
Post a Comment