Wednesday, October 2, 2024

"लाडक्या बहिणीं"ना दिवाळीपूर्वीच मिळणार "भाऊबीज"; अजितदादांनी जाहीर केली पुढील हप्ता मिळण्याची तारीख

"लाडक्या बहिणीं"ना दिवाळीपूर्वीच मिळणार "भाऊबीज"; अजितदादांनी जाहीर केली पुढील हप्ता मिळण्याची तारीख 
मुंबई, वृत्तसेवा :

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच आणखी तीन हजार रुपयांची मोठी भेट मिळणार आहे. दिवाळीच्या आधी भाऊबीज म्हणून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करू अशी घोषणा करत हा अजित दादाचा वादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषता महिलांसाठी काही कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक योजना आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात होते आणि 30 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी बीड येथील एका सभेत लाडक्या बहिणींना आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आणखी तीन हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा केली आहे. साधारणपणे 10 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दिवाळीच्या आधीच आणखी तीन हजार रुपयांची मोठी भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. दिवाळीच्या आधी भाऊबीज म्हणून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करू अशी घोषणा करत हा अजित दादाचा वादा असल्याचे उपमुख्यमंत्र्यानी यावेळी म्हटले आहे. लाडकी बहीण' योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे आम्ही दहा ऑक्टोबरपर्यंत देणार आहोत. हे पैसे महिलांनी स्वतःसाठी वापरावे. महिलांनी सन्मानाने राहावे यासाठीच ही योजना आणली आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
=====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...