Sunday, October 6, 2024

योजनांचा लाभ सर्वसामान्य गरजू नागरिकांना झाल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; आजरा येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम

योजनांचा लाभ सर्वसामान्य गरजू नागरिकांना झाल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; आजरा येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम
आजरा, वृत्तसेवा :

 राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहे. आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे 600 हून अधिक नागरिकांची पेन्शनची कामे मंजूर करण्यात आली आहेत. शासकीय योजनांचा लाभ मतदार संघातील सर्वसामान्य गरजू नागरिकांना झाल्याचे समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. 
 यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राधानगरी विधानसभा मतदार संघात आजरा तालुक्यातील येणाऱ्या 35 गावातील संजय गांधी निराधार योजना, प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशन कार्ड, पंचायत समितीतर्फे गोठा, शौचालय अनुदान योजना या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. लाडकी बहीण योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा यावेळी गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करताना तहसीलदार समीर माने यांनी विविध शासकीय योजनांतील मंजूर लाभार्थ्यांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या 35 गावे व 26 ग्रामपंचायती यामधून या महिन्यात संजय गांधी निराधार योजनेचे 302 तर श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचे 310 असे एकूण 612 लाभार्थी आहेत. प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशन कार्डचे 76 लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजने अंतर्गत 9177 महिलांना पैसे प्राप्त झाले आहेत. तर 37 अर्ज प्रलंबित आहेत. संजय गांधी योजनेचे अजून सुमारे 300 अर्ज प्रलंबित आहेत. आचारसंहितेपूर्वी 8 ऑक्टोबरला या समितीची शेवटची मिटींग आहे. या मीटिंगमध्ये प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येईल. 
आमदार आबिटकर पुढे म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्वच शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्याचे काम केले आहे. निराधार पेन्शन योजना या योजनेचे सर्वसामान्यांसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. निराधार योजनेचे काम हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विकास यात्रेतील पुण्याईचे काम आहे. निराधार योजनेमध्ये संबंधित सर्व घटकांनीच संवेदनशील होऊन काम केले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना लाभ मिळाला आहे. राज्य शासनाने प्रत्येक योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदानं यांची काम केले असल्याचेही ते म्हणाले. संजय गांधी निराधार समितीचे आजरा तालुकाध्यक्ष अल्बर्ट डिसोजा म्हणाले, संजय गांधी निराधार समितीने गट तट न पाहता समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित दादा यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी समाजसेवेच्या घेतलेल्या व्रतामुळे आगामी काळात जनता त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. 
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जी. एम. पाटील, दत्ता पाटील, श्वेता सरदेसाई, श्रीपती यादव, सरपंच प्रियंका जाधव, सविता जाधव, युवराज पाटील, सुनील देसाई, चंद्रकांत गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, गोविंद गुरव, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई, अश्विन डोंगरे, महेश दळवी, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे उपस्थित होते. मारुती डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मंडल अधिकारी सुंदर जाधव यांनी आभार मानले.
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...