प्रशांत गुरव यांना "स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2024" प्रदान
आजरा, वृत्तसेवा :
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती,कागल यांचे वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आजरा तालुक्यातून व्यंकटराव हायस्कूल, आजराचे विज्ञान व गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,कागल येथे संपन्न झाला.
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी मार्गदर्शक, एनएमएमएस परीक्षा तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शनामध्ये सातत्याने तालुका व जिल्हास्तरावरील यश, विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी सहभाग, विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम राज्य आंध्रप्रदेश येथे आयोजित प्रशिक्षणात आठ दिवस सहभाग, गणित दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमामध्ये कृतीयुक्त सहभाग असे अनेक उपक्रम त्यांनी स्व-जबाबदारीने पूर्ण केले आहेत. केंद्रशासन पुरस्कृत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, विविध प्रज्ञाशोध परीक्षेत त्यांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सन 2007-2008 मध्ये सह्याद्री दूरचित्रवाहिनी व स्टार प्रवाह वाहिनीवरील' हा खेळ शब्दांचा' या कार्यक्रमांमध्ये यशस्वी सहभाग हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. इयत्ता दहावी आयसीटी विषय जिल्हा समन्वयक व कलचाचणी जिल्हा समन्वयक म्हणून येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शाळा सिद्धि उपक्रमामध्ये राज्य निर्धारक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा सर्व निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडलेली आहे. कोरोना सर्वेक्षण, कोविड योद्धा, पूरग्रस्तांना मदत, एड्सग्रस्त मदत, निवारा बालगृह मदतनिधीतही त्यांनी भरीव काम केले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, राष्ट्रीय व उपक्रमशीलता, क्रीडा या अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, कार्याध्यक्षा राजमाता जिजाऊ महिला समिती नवोदिता घाटगे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे,अमरसिंह घोरपडे, रणजीतसिंह पाटील, एम. पी. पाटील, बाबासाहेब पाटील, शिवानंद माळी, शिवगोंडा माळी, अण्णासाहेब पाटील (खातेदार), विविध शिक्षक संघटनांचे राज्य व जिल्हा नेते, प्राचार्य आर. जी. कुंभार, कृष्णा दावणे, मदन देसाई, महेश पाटील, विठ्ठल चौगुले, अनिता देसाई, अस्मिता पाटील, रेश्मा पाटील, किशोर खोत, प्रकाश पाटील, अजित चौगुले, तुकाराम गुरव, जितेंद्र पाटील, संदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शाहू ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी केले. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य आर. जी. कुंभार,पर्यवेक्षिका शेलार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
========================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
========================
No comments:
Post a Comment