वाटंगी येथे नवरात्री निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन
आजरा, वृत्तसेवा :
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती संचालित श्री. रवळनाथ देवस्थान उपसमिती वाटंगी (ता. आजरा) यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव व दसऱ्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीच्या वतीने वाटंगीचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिर शेजारी दुर्गामातेचे पूजन करण्यात येणार आहे. यावर्षीचे मुर्ती देणगीदार पुंडलिक अर्जुन कसलकर आहेत. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर ते शनिवार दि. 12 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी 58 किलो वजन गटाखालील स्थानिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी ठीक नऊ वाजता विद्यामंदिर वाटंगीच्या मैदानावर सुरू होईल. या स्पर्धेसाठी 5001, 4001, 3001, 1001 व चषक अशी बक्षीस आहेत. याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट डिफेंडर व उत्कृष्ट खेळाडू यासाठी आकर्षक बक्षीस आहेत. एका संघात एकाच गावातील खेळाडू असावे अशी अट आहे. या स्पर्धेसाठी 401 रुपये प्रवेश फी आहे. बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी ५६० किलो वजनी गट रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दुपारी बारा वाजता विद्यामंदिर वाटंगीच्या मैदानावर सुरू होईल. या स्पर्धेसाठी 5001, 4001, 3001, 2001 व चषक अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी एका संघात सात खेळाडू राहतील. सर्व खेळाडू एकाच गावातील असावेत. सात खेळाडूंचे वजन एकूण मिळून 560 किलो असावे, असे नियम रस्सीखेच स्पर्धेसाठी आहेत. या स्पर्धेसाठी 401 रुपयांची प्रवेश फी आहे. तसेच शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी वाटंगी गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेते अरुण पाटील या स्पर्धेचे सूत्रसंचालन करणार आहेत. याकरिता पैठणी, मिक्सर व प्रेशर कुकर यासह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रात्री ठीक नऊ वाजता ही स्पर्धा रवळनाथ मंदिर वाटंगी येथे होणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी पारस गिलबिले (8010686469), अक्षय देसाई (8806920965), शरद नांदवडेकर (8010500680) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा सर्व कार्यक्रम वाटंगी ग्रामस्थ, गावातील तरुण मंडळे व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून संपन्न होणार आहे.
====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
=====================
No comments:
Post a Comment