स्वाती गुरव यांना 'राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2024' प्रदान
गडहिंग्लज, वृत्तसेवा :
'कै.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर' यांच्यावतीने राज्यातील 27 जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातून जीवन शिक्षण मंदिर मुत्नाळ शाळेच्या शिक्षिका स्वाती सुरेश गुरव यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे संपन्न झाला.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, सहशालेय स्पर्धापरीक्षा तज्ञ मार्गदर्शक, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये यश, समूहनृत्य, समूहगीत सांस्कृतिक स्पर्धेत यश, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा विशेष उपक्रम 'ज्ञानी मी होणार' स्पर्धेत सलग तीन वर्षे यश, उपक्रमशीलता, आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन, पर्यावरण स्नेही उपक्रम आयोजन, 5 लाख 43 हजार रुपयांचा स्व-प्रयत्नातून शैक्षणिक उठाव, शिक्षक प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक, शासकीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी सहभाग, आपत्ती व्यवस्थापन व केलेली मदतकार्य, मराठी भाषा विशेष सुधार उपक्रम अशा अनेक अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. बी. एम. हिरडेकर (माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कुलसचिव संजय घोडावत विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपकुलसचिव डॉ.उत्तम सकट, उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षण उपनिरीक्षक आर. व्ही. चौगुले, गटशिक्षणअधिकारी डॉ.विश्वास सुतार, समरजीत पाटील उपस्थित होते. राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन तुषार पाटील, धनश्री पाटील, डॉ.अजित सूर्यवंशी, श्रीमती सुनिता पाटील यांनी केले. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, गटशिक्षणअधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांचे मार्गदर्शन, विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंदाचे सहकार्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत मुत्नाळ यांचे प्रोत्साहन लाभले.
=====================
No comments:
Post a Comment