आजरा अर्बन बँकेला "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार
आजरा, वृत्तसेवा :
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांचे मार्फत जिल्हास्तरीय बँकींग परिषदेच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आजरा अर्बन बँकेला "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ५०१ कोटी रुपये पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेस दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस सलग तिसऱ्या वर्षी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष निपुणराव कोरे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, आनंदा फडके, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर उपस्थित होते.
आजरा तालुक्यामध्ये ६४ वर्षापूर्वी बँकेचा कार्यविस्तार सुरू झाला. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास १५०० कोटी रुपयेच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत. बँक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्हयात व कर्नाटक राज्यातील बेळगावी व उत्तर कन्नड जिल्हयात एकूण ३५ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे. भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस असून वरील सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधनेचे आवाहन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी केले.
================
No comments:
Post a Comment