संभाजीराजे छत्रपती यांचा तीन दिवसाचा आजरा तालुका दौरा
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे तीन दिवस आजरा तालुका दौऱ्यावर आहेत. रविवार दि. 21 ते मंगळवार दि. 23 पर्यंत संभाजीराजे छत्रपती आजरा तालुक्यातील ग्रामीण भाग व वाड्या वस्त्यावर संपर्क दौरा करणार आहेत. या तीन दिवसीय दौऱ्याचे नेटके नियोजन आजरा तालुक्यातील महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे : रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 : लाकूडवाडी (सकाळी 8.30), सुळे (9.00), गजरगाव (9.30), सरंबळवाडी (10.00), कानोली (10.30), मलीग्रे-कागीणवाडी (11.00), कोळींद्रे-पोश्रातवाडी (11.30), शिरसंगी (दुपारी 12.30), वाटंगी-मोरेवाडी (1.30), चाफवडे (2.00), चितळे-भावेवाडी-जेऊर (4.00), कासार कांडगाव (5.00), पोळगाव (5.30), एरंडोल-सातेवाडी (सायंकाळी 6.00), लाटगाव (6.30), खानापूर-रायवाडा (7.00), देऊळवाडी (7.30), विटे (रात्री 8.00) आवंडी धनगरवाडा (8.30). सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 : सरोळी (सकाळी 8.30), निगुडगे (9.00), कोवाडे (9.30), पेद्रेवाडी-हाजगोळी बुद्रुक-हाजगोळी खुर्द (10.00), हत्तीवडे (11.00), होनेवाडी (11.30), मेंढोली (दुपारी 12.00), बोलकेवाडी (12.30), चित्रानगर (1.00) बुरुडे-भटवाडी (1.30), मुरुडे (2.00), सुलगाव-चांदेवाडी (2.30), सोहाळे (4.00), साळगाव (4.30), पेरणोली (5.00), हरपवडे-कोरीवडे (5.30), देवकांडगाव-विनायकवाडी (सायंकाळी 6.00), दाभील (6.30), शेळप-शेळपवाडी (7.00), खेडगे- पारपोली गावठाण (7.30), मुंगूसवाडी (रात्री 8.30), खेडे (9.00). मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 : भादवणवाडी (सकाळी 8.30), भादवन (9.00), मडिलगे (9.30), वडकशिवाले (10.00), महागोंड (10.30), वझरे (11.00), होण्याळी (11.30), करपेवाडी (दुपारी 12.00), चव्हाणवाडी (12.30), चिमणे (1.00), बेलेवाडी (1.30), झुलपेवाडी (2.00), धामणे (3.30), पेंढारवाडी (4.00), आरदाळ (4.30), हालेवाडी (5.00), मुमेवाडी (5.30), बहिरेवाडी (सायंकाळी 6.00), उत्तूर (6.30). याप्रमाणे नियोजन करण्यात आले असून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया आघाडीचे निमंत्रक यांनी केले आहे.
==============
No comments:
Post a Comment