अज्ञात वाहनाच्या धडकेत साळगावचा युवक ठार
आजरा वृत्तसेवा :
आजरा-उत्तुर मार्गावर हालेवाडी घाटातील एका अवघड वळणावर झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाने मोटर सायकलला दिलेल्या धडकेत साळगाव (ता. आजरा) येथील ओमकार संभाजी कांबळे (वय 22) हा तरुण ठार झाला. सिद्धार्थ सदाशिव कांबळे हा मोटरसायकल वरील दुसरा तरुण जखमी झाला आहे. ओमकार व सिद्धार्थ हे काही कामानिमित्त मोटरसायकल वरून कोल्हापूरला चालले होते. हालेवाडी घाटातील एका अवघड वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत ओमकार हा रस्त्यावर जोराचा आपटला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाला.
----- -----
No comments:
Post a Comment