Saturday, February 3, 2024

पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी धरणाचे काम बंद पाडणार; सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय

पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी धरणाचे काम बंद पाडणार; सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय


आजरा वृत्तसेवा :

 आजरा तालुक्यातील सर्फनाला धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले असून पुनर्वसनाचे काम मात्र अजूनही रखडले आहे. यावर्षी धरणात पाणी तुंबविले जाणार असून घळभरणीचं काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक होती, पण ती बैठक जिल्हाधिकारी यांनी घेतलेली नाही. त्यामुळे नवीन आलेले जिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची प्रकल्पग्रस्तांसाह बैठक घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याची खात्री देत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी ६ तारखेला पारपोली, गावठाण आणि खेडगे गावातील स्त्री-पुरुष मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद पाडतील असा निर्णय केला आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, प्रकाश कविटकर, संतोष पाटील, शंकर ढोकरे, गोविंद पाटील, श्रावण पवार यांच्यासह स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----  ----

No comments:

Post a Comment

शूरवीरांच्या देशसेवेचा कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे; निधी संकलन शुभारंभ, सशस्त्र सेना ध्वजदिन, विजय दिवस साजरा

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : शूरवीरांच्या देशसेवेचा कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे. त्यांच्या साहस, त्याग आणि राष्ट्रनिष्ठ...