"राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रशांत गुरव यांना प्रदान
आजरा वृत्तसेवा :
आजरा तालुका पेन्शनर संस्था आजरा व साहित्य सेवा संस्कृती मंडळ उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'पेन्शनर डे' निमित्त व्यंकटराव हायस्कूल,आजराचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना 'राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. गुरव यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा, विविध उपक्रम अशा विविध क्षेत्रातील केलेल्या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग मराठा शिक्षक संघाचे सल्लागार अशोक येजरे उपस्थित होते. कार्यक्रम उत्तुर विद्यालय, उत्तुर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोड साखर गडहिंग्लजचे माजी कार्यकारी संचालक विश्वासराव देसाई, सिद्धिविनायक होमीओ फार्मसीचे चंद्रकांत पवार, सेवानिवृत्त संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हिंदुराव पाटील, उत्तूरचे सरपंच किरण आमनगी, सरस्वती शिक्षण मंडळाचे सचिव बी. जे. पोतदार, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता जी. डी. यमगेकर उपस्थित होते. आजरा तालुका पेन्शनर्स संस्थेचे अध्यक्ष बी. डी. ढोनुक्षे ,उपाध्यक्ष महंमदगौस तकीलदार, सरचिटणीस एस. टी. हळवणकर, कार्यकारणी सदस्य एस. जी. इंजल, के. एम. पाकले, व्ही. एस. कांबळे, एस. जी. देसाई, व्ही. आर. बुवा, आशा खटावकर व इतर स्थानिक कमिटी सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी व्यंकटाराव हायस्कुल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य आर. जी. कुंभार, मदन देसाई, कृष्णा दावणे, प्रकाश पाटील, अस्मिता पुंडपळ, शोभा कुंभार, किशोर खोत, विलास गवारी,महेश यलगार, प्रकाश आर्दाळकर उपस्थित होते. गुरव यांना आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी व सर्व संचालकांचे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.
------ -------
No comments:
Post a Comment