सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य : जयवंतराव शिंपी; वाटंगी येथे रवळनाथ गृहतारण संस्थेचा शुभारंभ
आजरा वृत्तसेवा :
ग्रामीण भागात पसरलेल्या सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले. ते वाटंगी (ता. आजरा) येथे रवळनाथ सहकारी गृहतारण संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विजय देसाई यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात देसाई यांनी गृहतारण सहकारी संस्था स्थापन करण्यामागील उद्देश सांगून पहिल्याच दिवशी 50 लाखाचा ठेवी जमा झाल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी पुढे म्हणाले की, आजरा हा ग्रामीण व डोंगराळ तालुका असला तरी सहकारी संस्थेच्या योगदानामुळेच येथील भागाचा विकास झाला असून वाटंगी येथील रवळनाथ गृहतारण संस्था संस्थेचे चेअरमन विजयराव देसाई व एकनाथ गिलबिले व त्यांचे सहकारी निश्चितच यशस्वीपणे चालवतील असा विश्वास व्यक्त केला. वाटंगीचे सरपंच संजय पवार म्हणाले वाटंगी गाव सहकारी संस्थांच्या बाबतीत तालुक्यात अग्रेसर असून नव्याने सुरू झालेल्या या गृहतारण संस्थेमुळे गावच्या विकासात भर पडणार आहे. शिरसंगीचे सरपंच संदीप चौगुले म्हणाले, भागातील किणे, शिरसंगी, येमेकोंड, मोरेवाडी, चाफवडे या गावातील नागरिकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात वाटंगी येथील सहकारी संस्थांचे मोठे योगदान आहे. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर व शिवराज समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव गिलबिले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नायब तहसीलदार सुरेश देसाई, उपसरपंच स्वाती गुरव, माजी सरपंच रोमन करवालो, आप्पासो कुऱ्हाडे, भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष चौगुले, सी. आर. देसाई, एम. एम. देसाई, शशिकांत थोरवत, सुरेश शिंगटे सर, सुभाष चौगुले, विश्वास गाईंगडे, विलास जाधव, जुझेवाझ नोरोना, धनाजी देसाई उत्तमराव जाधव, रमेश तेजम, बाळू तेजम, सुजित देसाई, रणजीत देसाई उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी आभार मानले.
---- ---- ----
No comments:
Post a Comment