आजरा : प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अनिरुद्ध उर्फ बाळ अरविंद केसरकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांची उपस्थिती होती.
आजरा नगरपंचायतीवर भाजप प्रणित ताराराणी आघाडीची सत्ता आहे. या आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार विलास नाईक यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर केसरकर यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी केसरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. केसरकर यांचे नाव विलास नाईक यांनी सुचविले. तर यांनी संजिवनी सावंत अनुमोदन दिले. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष केसरकर यांचा सत्कार यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक किरण कांबळे, आनंदराव कुंभार, आलम नाईलवाडे, अस्मिता जाधव, सुमैय्या खेडेकर, शकुंतला सलामवाडे उपस्थित होते.
Young generation
ReplyDelete