कोल्हापूर (प्रतिनिधी) :
रविवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात चार कोरोना बाधित आढळले असतानाच पुन्हा दुपारनंतर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सार्यांचेच धाबे दणाणले आहेत. रविवारी दिवसभरात एकूण आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधिताची संख्या ४४ झाली आहे. सकाळी भुदरगड, आजरा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एकजण तर सीपीआर रूग्णालयातील एक डॉक्टर कोरोना बाधीत आढळले आहेत. दुपारी अहवाल अालेल्यामध्ये एक महिला, एक लहान मुलगा तर दोन पुरूषांचा समावेश आहे. सदर रूग्ण भुदरगड व पन्हाळा तालुक्यातील आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय :
विकास डिजिटल मिडीया
7410168989
Nice information dada 👍
ReplyDelete