Monday, December 1, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : साधना मुरुकटे (काँग्रेस, प्रभाग सहा)

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : साधना मुरुकटे (काँग्रेस, प्रभाग सहा)
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आजरा नगरपंचायत होऊन सात वर्ष झाल्यानंतरही प्रभाग सहाचा विकास खुंटला आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये नगरपंचायतीच्या एकूणच कारभाराबद्दल नाराजी दिसून येते. आगामी काळात ही चित्र बदलण्यासाठी साधना मुरुकटे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी साधना मुरुकटे यांनी विकास न्यूजशी खास संवाद साधला...

साधना अमोल मुरुकटे म्हणाल्या, आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून हात चिन्हावर निवडणूक लढवत आहे. मी या निवडणुकीच्या रिंगणात येण्याचे कारण की, माझा प्रभाग व माझे शहर याचा खुंटलेल्या विकासाने माझं अस्वस्थ झालेलं मन. सात-आठ वर्षांपूर्वी शहराला नगरपंचायत मंजूर झाली, त्यावेळी आमच्या खूप काही अपेक्षा होत्या. मात्र सात-आठ वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर अधिकच भकास झाले आहे. माझा प्रभाग ही त्याला अपवाद राहिलेला नाही. ज्यांनी माझ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी प्रभागाचा कोणताही विकास साधलेला नाही. गेल्या चार वर्षात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा मनस्ताप आम्हा महिला वर्गाला खूप मोठा सहन करावा लागतो. नेहमीच अपुरे पाणी मिळत आले आहे. पाणीही म्हणावे तेवढे चांगले नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मात्र याकडे हेतू पुरस्कार कानाडोळा करण्यात आला. पाणी योजनेच्या नावाखाली रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे धड रस्तेही प्रभागात उपलब्ध नाहीत. रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. सगळेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामुळे धुळीचा देखील मोठा त्रास साऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रभागातील जनता अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. चांगले आरोग्य नाही की दर्जेदार शिक्षण नाही. शहराला नैसर्गिक सौंदर्य असताना देखील कोठेही बाग-बगीच्या निर्माण झाला नाही. कचऱ्याचा प्रश्न तर कायमचाच आहे. कचऱ्याचा वेळेवर उठाव होत नाही. कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया केली जात नाही. यामुळे प्रदूषण देखील वाढले आहे. तसेच शहरात विस्कटून पडलेला कचरा दिसला की मनाला खूपच वाईट वाटते. प्रभागात गटर्स देखील व्यवस्थित नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. प्रभागाचे हे सारे चित्र बदलण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. प्रभागाला नवी दिशा देण्यासाठी आपण सारे जण माझ्या पाठीशी राहाल असा विश्वास आहे. आगामी काळात नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी, सुव्यवस्थित रस्ते, सांडपाण्याची योग्य व्यवस्था, कचरा उठावाचे योग्य नियोजन, चांगले आरोग्य,  दर्जेदार शिक्षण, प्रभागात उद्यान यासाठी काम करून प्रभाग सहा व शहराला एक नवी दिशा देण्यासाठी हात या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला संधी द्यावी ही विनंती साधना मुरुकटे यांनी केली आहे.
=========================

No comments:

Post a Comment

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला

मुंबई, न्यूज नेटवर्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्या...