Wednesday, November 12, 2025

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची (महालक्ष्मी) मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
     
यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेवून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पद्मश्री डॉ. विकास महात्मे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी राष्ट्रपतींचे खाजगी सचिव अमरीकसिंग, अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा, डॉ. मनोज कुमार, पन्हाळा प्रांताधिकारी डॉ.समीर शिंगटे, सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...