Wednesday, November 12, 2025

अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचा शुक्रवारी वाढदिवस

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांचा वाढदिवस शुक्रवार (दि. 14) रोजी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

अशोक अण्णा चराटी यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही वाढदिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे. माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाढदिवस कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. आजरा हायस्कूल आजराच्या मैदानावर शुक्रवार (दि. 14) रोजी सकाळी ठीक अकरा वाजता वाढदिवस कार्यक्रम होणार आहे. या वाढदिवस कार्यक्रमावेळी अशोक अण्णा चराटी यांना शुभेच्छा देताना हार किंवा पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा द्याव्या, असे आवाहन वाढदिवस गौरव समितीने केले आहे. तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी आजरा बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, विजय पाटील, रमेश कुरुणकर, दशरथ अमृते उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...