आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल कोणत्या एक क्षणी वाजू शकत. सुरुवातीच्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सर्वच शहरी भागामध्ये निवडणुकांची जोरदार तयारी इच्छुकांच्या मधून सुरू आहे. गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ रखडलेली आजरा नगरपंचायत निवडणुकीही तोंडावर येऊन ठेपली आहे. आजरा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण व मतदार याद्या प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सारेच इच्छुक कामाला लागले आहेत. यातच आता आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दहा मधून सना चाँद यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी, यासाठी प्रभागातील नागरिक मागणी करू लागले आहेत. प्रभागातील युवा वर्गाचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका सर्वसामान्य घरातील युवकाने आपले प्रतिनिधित्व करावे, यासाठी प्रभागातील सर्वच नागरिक सना चाँद यांना भेटून आपला पाठींबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवार ठरवताना सर्वच नेतेमंडळींना सना चाँद यांचा विचार करावा लागणार आहे.
सर्वसामान्य घरातील असलेल्या सना चाँद या युवकाने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य सुरू केले आहे. विविध माध्यमातून समाजातील उपेक्षित व गरजू घटकांना त्यांनी मदत केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व विशेषतः युवा वर्ग यांच्याकडून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. याची प्रचिती त्यांचा नुकताच साजरा झालेल्या वाढदिवसाच्या वेळी साऱ्यांनाच आली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच आपल्या मनोगतामध्ये चाँद यांच्या सामाजिक कामाचे तोंड भरून कौतुक केले. यातूनच त्यांच्या कार्याची महती नेते मंडळाच्या पर्यंत पोहोचल्याचे सिद्ध होते. त्यामुळे सना चाँद यांच्यासाठी आगामी काळात पोषक वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
सना चाँद यांच्या एकंदरीत वाटचालीत त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्याचबरोबर रसूल लाडजी, निहाल चाँद, शमशुद्दीन चाँद, जमीर लाडजी, इरफान नेसरीकर, अझरुद्दीन दरवाजकर, इरफान दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, मुजीब मुराद, मुबारक चाँद, असिफ हिंग्लजकर या मित्रांची देखील मोलाची साथ लाभली आहे. ही साथ आगामी काळात देखील अशीच कायम राहून, सना चाँद यांना आजरा नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार साऱ्यांनी केला आहे.
==========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment