कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रीय भेटी देऊन गुणवत्तापूर्ण आहार, स्वच्छता आणि सेवांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. कोल्हापुरातील जय पॅलेस हॉल, गारगोटी रोड, कळंबा येथे आयोजित विभागीय कार्यशाळा आणि आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील सुमारे पाचशे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर राज्यभरातील १० हजारांहून अधिक वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाले. मंत्री आबिटकर यांनी शासकीय आरोग्य सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा आणि सर्वसामान्यांना वेळेत दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी कठोर नियंत्रणाची गरज व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण औषधे, आहार, स्वच्छता आणि सेवा यावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. चुकीचे काम आढळल्यास तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
रुग्णवाहिका सेवांबाबत येणाऱ्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचे निर्देश देताना त्यांनी १०२ रुग्णवाहिकांना १०८ प्रमाणेच जबाबदाऱ्या देण्याचे संकेत दिले. या बैठकीत प्रथमच राज्यातील मंडळ स्तरावरील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा झाली. यापुढे प्रत्येक मंडळात अशा आढावा बैठका घेतल्या जातील, असे मंत्र्यांनी जाहीर केले. शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतींची संख्या वाढावी आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार शक्य नसल्यासच खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा, पण याचा अर्थ असा नाही की सर्व रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत समाविष्ट आजारांची संख्या वाढवण्यात आली असून, शासकीय रुग्णालयांनी चांगल्या सेवा देऊन रुग्णांचा विश्वास संपादन करावा, असेही ते म्हणाले. उपसंचालक आरोग्य डॉ. दिलीप माने यांनी क्षेत्रीय भेटींदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आढळलेल्या त्रुटींचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. तसेच विभागात चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मानही यावेळी मंत्र्यांनी केला. बैठकीला डॉ. नितीन अंबार्डेकर, श्रीधर पंडीत, डॉ. प्रशांत हिंगणकर, डॉ. उज्वला कळंबे, डॉ. योगेश होटकर, डॉ. दयानंद जगताप, डॉ. सुहास खेडकर, डॉ. शरद दराडे, स्वाती पाटील, डॉ. निपुण विनायक, डॉ. क्रांती कटक, पंकज नंदनवार आणि गौरव जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा आणि जबाबदारी निश्चितीकरणाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला, ज्यामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment