Monday, September 15, 2025

व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हिंदी विषय शिक्षक श्री. डी. आर. पाटील आणि श्रीम. आर. एन. पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी आपले विचार मांडले.
    
यावेळी हिंदी विभागातील  सौ. एस. डी. इलगे, श्रीम. आर. एन. पाटील, सौ. देसाई एस. वाय., श्री. डी. आर. पाटील, श्री. व्ही. टी. कांबळे, सौ. ढेकळे एस. पी., श्रीम. बिल्ले एम. व्ही. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक वर्ग इयत्ता दहावी ड व वर्गशिक्षिका सौ. एस. टी. पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. देसाई, सर्व व्यंकटराव परिवार व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार श्री. व्ही. टी. कांबळे यांनी मानले.
============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...