Friday, September 12, 2025

आदमापुरातील बाळूमामा मंदिर १६ सप्टेंबरअखेर दर्शनासाठी बंद

गारगोटी, विकास न्यूज नेटवर्क :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत सदगुरु बाळूमामा मंदिर शनिवार दि. १३ ते मंगळवार१६ सप्टेंबरदरम्यान चार दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे

आदमापुरातील बाळूमामा मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळूमामा मंदिर, भक्त निवास, अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे चार दिवस मंदिर व अन्नछत्र बंद राहणार असून दि. १६ सप्टेंबर रोजी भक्त निवास बंद राहणार आहे, अशी माहिती बाळूमामा मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...