Wednesday, September 3, 2025

आजरा अर्बन बँक म्हणजे विश्वास : चेअरमन अशोक चराटी, आजरा अर्बन बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मल्टीस्टेट आजरा अर्बन बँकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून आजरा अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. यामुळे आजरा अर्बन बँक म्हणजे विश्वास असे समीकरण तयार झाले आहे. यात सभासद व कर्मचारी यांचे देखील मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आजरा बँक चे चेअरमन व अजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी केले. ते आजरा अर्बन बँकेच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

संचालक डॉ. दीपक सातोसकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी 75 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचे संचालकांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. अनिकेत चराटी यांची आजरा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. चेअरमन अशोक चराटी पुढे बोलताना म्हणाले, बँकेकडे आधुनिक कार्यप्रणाली आहे. त्यामुळे बँकेच्या डिजिटल व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारत सरकार व राज्य सरकार यांच्याकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा निधी बँकेच्या खात्यावर जमा होत आहेत. प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना बँकेकडे सुरू आहेत. माझी बँक मला मोठी करायची आहे या विश्वासाने बँकेसाठी सर्वच घटक राबत आहेत. आगामी काळात बँकेची गोवा राज्यात शाखा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी सभा नोटीस, विषय पत्रिका वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गंभीर व संचालक मंडळांने सभासदांच्या लेखी प्रश्नांना तसेच ऐनवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी व्हा. चेअरमन संजय चव्हाण, संचालक सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सूर्यकांत भोईटे, सुनील मगदूम, विजय पाटील, ज्योस्ना चराटी, के. व्ही. येसणे, डॉ. अंजली देशपांडे, जनार्दन टोपले, जी. एम. पाटील, विनय सबनीस, राजू पोतणीस, पांडुरंग लोंढे, सिद्धेश नाईक यांच्या सभासद उपस्थित होते. सहायक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.
=========================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...