Friday, April 4, 2025

उपवनसंरक्षक यांच्या उपस्थितीत बैठक ठरल्याने ७ एप्रिल रोजी आजरा वनविभागावर होणारा मोर्चा तात्पुरता स्थगित

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपावा, शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. उपवनसंरक्षक यांच्या बरोबर १६ एप्रिल रोजी बैठक घेण्याची नियोजन आजरा वन विभागाच्या वतीने करण्यात आल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी श्रमिक पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक होती. बैठक चालू असताना वनविभागाच्या प्रतिनिधीने येऊन १६ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याचे पत्र दिले. यावर बैठकीत चर्चा झाली, उपवनसंरक्षक यांचे सोबतच्या बैठकीत कशी चर्चा होते हे पाहून चळवळीची पुढील दिशा ठरवावी असे एकमताने ठरले. १६ तारखेला सकारात्मक चर्चा न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत ठरला. बैठकीला कॉ. संपत देसाई, संजय सावंत, प्रकाश मोरुस्कर, गोविंद पाटील, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, प्रकाश शेटगे, अशोक मालव, बाबू येडगे, नारायण भडांगे, सचिन बिरजे, भीमराव माधव, शंकर पाटील, विष्णू पाटील,मारुती पाटील, ज्ञानदेव गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...