आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील सर्वच बँकांमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर अग्रक्रमाने झाला पाहिजे. तसेच बँकांमधील सर्व फलक मराठी भाषेत लावले गेले पाहिजेत, अन्यथा बँकांच्या विरोधात मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आजरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक शाखा मडिलगे या बँकांच्या शाखा मॅनेजर यांना देण्यात आले आहेत.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमा नुसार महाराष्ट्रातून सर्व बँकांचे व्यवहार हे मराठीत असणे व फलक पण मराठीत असणे गरजेचे असताना, आजरा शहरातील बँकांच्या शाखा मध्ये सदरचे नियम धाब्यावर बसवून मराठी भाषेचा अवमान केल्याचे मनसेच्या निदर्शनास येत आहे. त्या जागी हिंदी व इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जात आहे तसेच हिंदी व इंग्रजी बोलण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे सर्व बँकांच्या शाखा मध्ये इथून पुढे सर्व व्यवहार हे मराठीतच असले पाहिजे. त्यामध्ये रक्कम जमा करणे, काढणे या पावत्या मराठीतच असल्या पाहिजे. त्याचबरोबर सर्व योजनांचे फलक व त्यासोबत कर्जासंबंधीचे जे करार असेल ते सर्व इथून पुढे सर्व मराठीतच असली पाहिजे. याबाबत येणाऱ्या आठ दिवसात सदर नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावे तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना बँकांच्या विरोधात मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, तालुका उपाध्यक्ष ऍड. सुशांत पोवार, तालुका सचिव वसंत घाटगे, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष सरिता सावंत, विनायक घंटे, मयूर हरळकर, सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment