Saturday, April 5, 2025

कोल्हापूर जिल्ह्यातील 2025 ते 2030 करीताचे सरपंच आरक्षण सोडत 8 एप्रिल रोजी; जाणून घ्या तालुकानिहाय आरक्षित जागा

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम 1964 (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र. 87 दि. 5 मार्च 2025) अन्वये अधिसूचना प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ (1)(2) नुसार प्रस्तुत अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले असून या अधिसूचनेव्दारे जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींकरीता सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणा-या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे जिल्हानिहाय वाटप केली आहेत. याबाबत तालुकानिहाय सरपंच पद आरक्षण निश्चित करुन आदेश पारीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेला प्रवर्ग व आरक्षित एकूण सरपंच पदाची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अनुसूचित जाती (महिलांसह) - 138 (त्यापैकी 69 महिलांकरीता )
अनुसूचित जमाती (महिलांसह) - 07 (त्यापैकी 4 महिलांकरीता )
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह)- 273 (त्यापैकी 137 महिलांकरीता)
सर्वसाधारण (महिलासह) - 608 (त्यापैकी 304 महिलांकरीता )

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक 1964 मधील नियम (3) (4) (4 अ) (5) (6) अन्वये प्राप्त अधिकारानुसार शासनाने दिनांक 5 मार्च 2025 अन्वये अधिसूचित केलेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार सरपंच पदाचे आरक्षण प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्याचा एकूण गोषवारा खालीलप्रमाणे नमुद केला आहे.

पन्हाळा - ग्रामपंचायत- 111,  आरक्षण- अनुसूचित जाती - 8, अनुसूचित जाती स्त्री - 8, नागरिकांचा मागास प्रवर्ग -15, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- 15, सर्वसाधारण- 32, सर्वसाधारण स्त्री- 33.
शाहूवाडी - ग्रामपंचायत- 106,  आरक्षण- अनुसूचित जाती - 6, अनुसूचित जाती स्त्री - 7, अनुसूचित जमाती - 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग -14, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 14, सर्वसाधारण - 32, सर्वसाधारण स्त्री - 32.
करवीर - ग्रामपंचायत- 118,  आरक्षण- अनुसूचित जाती - 9, अनुसूचित जाती स्त्री - 10, अनुसूचित जमाती - 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग -15, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 16, सर्वसाधारण - 34, सर्वसाधारण स्त्री - 33.
गगनबावडा - ग्रामपंचायत - 29,  आरक्षण - अनुसूचित जाती - 3, अनुसूचित जाती स्त्री - 2,  नागरिकांचा मागास प्रवर्ग- 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- 4, सर्वसाधारण - 8, सर्वसाधारण स्त्री - 8.
कागल - ग्रामपंचायत- 83,  आरक्षण- अनुसूचित जाती - 6, अनुसूचित जाती स्त्री - 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 11, सर्वसाधारण - 25, सर्वसाधारण स्त्री - 24.
राधानगरी - ग्रामपंचायत- 98,  आरक्षण- अनुसूचित जाती - 6, अनुसूचित जाती स्त्री - 5, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 13, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 13, सर्वसाधारण - 30, सर्वसाधारण स्त्री - 31.
हातकणंगले - ग्रामपंचायत- 61,  आरक्षण- अनुसूचित जाती - 6, अनुसूचित जाती स्त्री - 6, अनुसूचित जमाती स्त्री- 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग - 8, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- 8, सर्वसाधारण -16, सर्वसाधारण स्त्री - 16.
शिरोळ - ग्रामपंचायत - 52,  आरक्षण - अनुसूचित जाती - 5, अनुसूचित जाती स्त्री - 5, अनुसूचित जमाती- सर्वसाधारण - 1, स्त्री- 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 7, सर्वसाधारण - 13, सर्वसाधारण स्त्री - 13.
आजरा - ग्रामपंचायत- 73,  आरक्षण- अनुसूचित जाती - 4, अनुसूचित जाती स्त्री - 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 9, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 10, सर्वसाधारण - 23, सर्वसाधारण स्त्री - 23.
भुदरगड - ग्रामपंचायत - 97,  आरक्षण- अनुसूचित जाती - 5, अनुसूचित जाती स्त्री - 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग - 13, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 13, सर्वसाधारण - 30, सर्वसाधारण स्त्री - 30,
गडहिंग्लज - ग्रामपंचायत - 89,  आरक्षण- अनुसूचित जाती - 5, अनुसूचित जाती स्त्री - 5, अनुसूचित जमाती स्त्री- 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 12, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 12, सर्वसाधारण - 27, सर्वसाधारण स्त्री - 27.
चंदगड - ग्रामपंचायत- 109,  आरक्षण- अनुसूचित जाती - 6, अनुसूचित जाती स्त्री - 5, अनुसूचित जमाती  स्त्री - 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग - 15, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 14, सर्वसाधारण - 34, सर्वसाधारण स्त्री - 34,
अशा एकूण  1 हजार 26 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण- अनुसूचित जाती - 69, अनुसूचित जाती स्त्री - 69, अनुसूचित जमाती- सर्वसाधारण - 3, स्त्री- 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 136, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - 137, सर्वसाधारण - 304, सर्वसाधारण स्त्री - 304 याप्रमाणे आहे.

आरक्षण निश्चित करतेवेळी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये केलेल्या सुधारणा नुसार तसेच शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारीत तरतूदी नुसार निश्चिंत केली आहेत. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत सरपंच पदे वाटप करतांना समर्पित आयोगाच्या अहवालानुसार, तालुकानिहाय वाटप केलेली आकडेवारी न घेता जिल्ह्याकरीता सरासरी देय असणारी 26.6 टक्क्याच्या प्रमाणात तालुकानिहाय ना.मा.प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. निवडणूक नियम 1964 मधील 2 (अ) चे पोटनियम (4) व (6) मधील तरतूदीनुसार सरपंच पदे आरक्षीत करावयाची आहेत. तहसिलदार यांनी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करुन सरपंच पदे प्रवर्ग निहाय आळीपाळीने नेमून द्यावीत.

आरक्षण काढण्याकामी तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या तालुका व आरक्षण सोडतीचे ठिकाण खालीलप्रमाणे -
करवीर - बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कोल्हापूर
कागल - बहुउद्देशीय सभागृह, तहसिलदार कार्यालय कागल,
शाहूवाडी - पंचायत समिती सभागृह, शाहूवाडी
पन्हाळा - मयूर हॉल, नगरपरीषद, पन्हाळा
हातकणंगले - नवीन प्रशासकीय इमारत,तहसिल कार्यालय हातकणंगले
शिरोळ - नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, शिरोळ
आजरा - नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, आजरा
चंदगड - प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, चंदगड
भुदरगड - पंचायत समिती भुदरगड, दिनकरराव जाधव सभागृह, गारगोटी
गडहिंग्लज - बचत भवन, पंचायत समिती, गडहिंग्लज
राधानगरी - राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती, राधानगरी
गगनबावडा - तह‌सिलदार कार्यालय, गगनबावडा

तालुकानिहाय निश्चि‌त केलेल्या (बिगर अनुसुचित क्षेत्रा मधील) ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण व महिला आरक्षण निश्चित करण्याकामी सोडत पध्दतीने नमुद ठिकाणी काढण्याकामी संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या वतीने प्राधिकृत करण्यात येवून आरक्षण सोडत काढण्याकामी मंगळवार दि. 8 एप्रिल 2025 नियुक्ती करण्यात येत आहे.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...