Friday, April 4, 2025

सहकार भारती कोल्हापूरची आजरा तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी डॉ. अनिल देशपांडे

आजरा विकास न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथील यशवंत प्रोसेसिंग येथे सहकार भारती कोल्हापूरची बैठक प्रदेश महिला प्रमुख सौ. वैशाली आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आजरा तालुक्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यानुसार तालुकाध्यक्ष म्हणून डॉ. अनिल देशपांडे यांची तर महामंत्री पदावर श्रीपाद वामन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. इतर पदांवर मिलिंद पूजारी, रमेश कारेकर, जयवंत येरुडकर, महादेव खाडे आदिंची निवड करुन त्यांना सहकार भारती कोल्हापूर अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना कोल्हापूर विभाग सहसंघटक जवाहर छाबडा यांनी केली. सौ. वैशाली आवाडे यांचेसह प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले यांनी सहकार भारती चे कार्य व उद्देशांची माहिती दिली. जिल्हा महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी संघटन प्रमुख सागर हुपरे, सचिव संजय सातपुते, महिला प्रमुख सुषमा पाटील, कोषाध्यक्ष अमोल कनवाडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...