Monday, April 21, 2025

अरुण डोंगळे ट्रस्टच्या वतीने ३० रोजी आदमापूर येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क :
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट, घोटवडे आणि श्री संत बाळूमामा देवालय, आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ३० एप्रिल रोजी आदमापूर येथील बाळूमामा मंदिरामध्ये मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्ट उपाध्यक्ष व भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे यांनी दिली

डोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त गेली सलग १४ वर्षे संत बाळूमामा मंदिर आदमापूर येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोरगरीब यांचा विवाह सोहळ्यांसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे अभिषेक डोंगळे यांनी सांगितले.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टकडून वधूसाठी मणि-मंगळसुत्र, वधू-वरांसाठी लग्नाचा पेहरावा व संसारोपयोगी भांड्यांचा संच भेट, विनामुल्य विवाह मंडप, हारतुरे, भटजी, अक्षता तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. वधू पित्यास शासनाचे अनुदान मिळवून देण्यास विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अभिषेक डोंगळे यांनी केले आहे.

या सामुदायिक विवाह सोहळ्यातील विवाहासाठी शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीसाठी सुहास डोंगळे (९८२२९७६६६६), धनाजी पाटील (९४२३२८०१७१), कृष्णात डोंगळे (९४०३१०६४४२), पवन गुरव (९६९९७०१०४०), उत्तम पाटील (९६६५८९६६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी धनाजी पाटील, राजू चौगले, मुकुंद पाटील, उदय पाटील, संदीप ढेकळे, के. द. पाटील, धनाजी बरगे, संजय तिबिले उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांनी आभार मानले.
================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...