Tuesday, April 8, 2025

आजरा : 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर; 23 ठिकाणी सर्वसाधारण सरपंच, 37 ग्रामपंचायत मध्ये महिलाराज

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आजऱ्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

सुरुवातीला तहसीलदार समीर माने यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेची माहिती दिली. तालुक्यातील एकूण 73 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये चार जागा अनुसूचित जाती करिता, चार जागा अनुसूचित जाती महिलांकरता, नऊ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता, दहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, 23 जागा सर्वसाधारण महिलांकरता तर 23 जागा सर्वसाधारण करिता आरक्षित करण्यात आल्या. शौर्य जीवन आजगेकर, विहान रुपेश ढवळ, श्रीशा सुधीर साठे, राही विजय थोरवत, प्रतीक प्रकाश कोलते या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी आजरा साखर कारखाना संचालक उदयराज पवार, एम. के. देसाई, अनिल फडके, राजू मुरकुटे, दिगंबर देसाई, विजय केसरकर, मनसे तालुकाप्रमुख आनंदा घंटे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, दशरथ अमृते, उत्तम रेडेकर, मसणू सुतार, शिवाजी गिलबिले, राजू पोतणीस, लहू वाकर, संतोष पाटील, संदीप चौगुले, संतोष चौगुले, राजू होलम, विलास पाटील, रणजित सरदेसाई, संभाजी सरदेसाई, लक्ष्मण पाटील, सुधीर सुपल, देवदास गुरव यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सन 2025 ते 2030 या कालावधी करता आजरा तालुक्यातील सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे :
अनुसूचित जाती : देऊळवाडी, होन्याळी, सुळे, मडीलगे.
अनुसूचित जाती महिला : हरपवडे, हाजगोळी खुर्द, उत्तूर, मेंढोली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : धामणे, पेंढारवाडी, होणेवाडी, चितळे, भादवण, महागोंड, मुमेवाडी, वडकशिवाले, हाजगोळी बु.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : किटवडे, चिमणे, पेद्रेवाडी, निंगूडगे, बेलेवाडी हू, साळगाव, हाळोली, कोळीद्रे, भादवनवाडी, सुलगाव
सर्वसाधारण : खोराटवाडी, मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, गवसे, एरंडोल, हात्तीवडे, किणे, कासार कांडगाव, लाकूडवाडी, सरबंळवाडी, वझरे, पारपोली, कानोली, पोळगाव, सोहाळे, इटे, चांदेवाडी, बुरुडे, आरदाळ, खानापूर, पेरणोली, बहिरेवाडी.
सर्वसाधारण महिला : सरोळी, शिरसंगी, हालेवाडी, देवर्डे, कोवाडे, वाटंगी, मुरुडे, देवकांडगाव, कोरिवडे, लाटगाव, दाभिल, सुळेरान, आवंडी, शेळप, मासेवाडी, शृंगारवाडी, गजरगाव, चाफवडे, करपेवाडी दुमाला, झुलपेवाडी, वेळवट्टी, मसोली, खेडे.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...