आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा झाला . या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या संचालिका अलकाताई शिंपी व प्रमुख पाहुण्या डॉ. मंगल मोरबाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक सचिन शिंपी, प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, या कार्यक्रमाच्या आयोजिका आशा सचिन गुरव व सर्व व्यंकटराव परिवार उपस्थित होता.
प्रास्ताविक सौ. एस. पी. कुंभार यांनी केले. त्यांनी सांगितले की आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार आहे. स्त्रीने आपली झेप सर्व क्षेत्रात घेतली आहे. ही स्त्री अबला नाही तर आजची स्त्री ही धडधडता अंगार आहे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीयांचे स्वागत व महिला दिनानिमित्त सर्व शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. शिवाजी पारळे यांनी महिला दिनांला शुभेच्छा देताना शांता शेळके यांची कविता सादर केली.
प्रमुख वक्त्या डॉ.मंगल मोरबाळे यांनी आपल्या व्याख्यानामधून "आजची स्त्री ही सुरक्षित आहे का?, आजच्या स्त्रीने आहाराच्या बाबतीत दक्ष राहिले पाहिजे, सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. तरच आपलं शरीर उत्तम राहू शकते. आरोग्यम् धनसंपदा यासाठी दररोज तिने व्यायाम केला पाहिजे. योगासन केली पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत सर्व स्त्रियांनी सजग राहिले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी शाळेला येताना व जाताना अनोळखी व्यक्ती वर पटकन विश्वास ठेवू नये. तसेच मोबाईलचा शक्यतो वापरच करू नये, असे सांगितले.
संचालक सचिन शिंपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना समानता दिल्याची थीम यावर आपले विचार मांडले व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संचालिका अलकाताई शिंपी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, स्त्री ही पूर्वापार शोषित, कष्ट सहन करणारी, कर्तबगार आणि संपूर्ण पिढी घडवणारी आहे. राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यासारख्या असंख्य महिलांचे तत्कालीन कार्य आज समाजासमोर आदर्श आहेत. त्याचबरोबर आजच्या स्त्रीमध्ये पण कणखरपणा, स्वाभिमान देशाभिमान, कुटुंबाबद्दल प्रेम अपार आहे त्यामुळेच कोरोना सारख्या काळातही अनेक महिलांनी आपला विस्कटलेला संसार आणि आर्थिक परिस्थिती सावरताना विविध लघुउद्योगधंदे , अपार कष्ट करून पुन्हा उभे केले. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी आज समर्थपणे पेलली आहे. अशा महिलांचाही या दिवशी सन्मान होणं गरजेचं आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एम. सी. हरेर यांनी केले. सौ.व्ही. ए. वडवळेकर यांनी "कर्तव्य" या स्वरचित कवितेतून आपले विचार मांडले. अस्मिता पाटील यांनी आभार व्यक्त केले.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment