Wednesday, March 5, 2025

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत व न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार मुकाबला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी दारूण पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत वि. न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्या उभारत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठं आव्हान दिलं होतं. पण सातत्याने विकेट्स गमावल्याने आफ्रिकेचा संघ मागे राहिला. भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुबईत ९ मार्चला खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत 4 विकेट्सने पराभूत करत आधीच अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तर आता न्यूझीलंडने आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामान्याचे तिकिट मिळवले. न्यूझीलंड संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 362 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने प्रतिउत्तरात 312 धावा केल्या.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...