कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक आणि राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्दचे सुपुत्र दिलीप रोकडे यांचा संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कला दिग्दर्शन दिलीप रोकडे म्हणाले कि, माझ्या जडणघडणीत गोकुळचा मोलाचा वाटा आहे. घरची एक गुंठा ही जमीन नसलेलं तारळे खुर्द सारख्या खेड्यातील आमचे कुटुंब मात्र आमच्या आई-वडिलांनी दूध व्यवसायातून आमचे पालन- पोषण, शिक्षण केले. दुसऱ्यांची जमीन कसून जनावरांसाठी वैरण उपलब्ध केली. गोकुळची दहा दिवसाला होणारी दूध बिले हा आमच्या कुटुंबाचा आर्थिक आधार होता. साहजिकच माझ्या जडणघडणीत गोकुळचा मोलाचा वाटा आहे असे उद्गार दिलीप रोकडे काढले.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळच्या एका सामान्य दूध उत्पादकाचा सुपुत्र आपल्या कर्तृत्व आणि कार्यक्षमतेच्या जोरावर बॉलीवूड मध्ये सेलिब्रिटी बनला आहे. एक यशस्वी कला दिग्दर्शक म्हणून याचा गोकुळला अभिमान आहे असे उद्गार चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले. गेले काही दिवस देशभरातील चित्रपटसृष्टीत छावा या ऐतिहासिक चित्रपटाची हवा असून या चित्रपटाचे कला दिग्दर्शन दिलीप रोकडे यांनी केले आहे. रावडी राठोड, रामलीला, पद्मावत, सुपर थर्टी, भूतनाथ २ अशा अनेक गाजल्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले आहे. यावेळी दिलीप रोकडे व कुटुंबियांचा सत्कार अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य गणपती रोकडे, सौ. स्वरा रोकडे व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
====================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment