कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, भारताच्या इतिहासातील शौर्य, संघटक आणि प्रचंड देशभक्ती असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे एक प्रेरणास्त्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असून ते सत्य आणि न्यायाचे योद्धे होते. त्यांची युद्धनीती, प्रशासकीय कौशल्य आणि प्रगतीशील दृष्टिकोन हे प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी संग्राम मगदूम यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शिवगर्जना सादर केली. स्वागत प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुंरबेकर, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, आर.एन.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment