Sunday, December 22, 2024

साहित्य हा समाजाचा आरसाच नव्हे तर परिवर्तनाचे साधन आहे : केंद्रीय हिंदी निदेशालय सहायक निदेशक रत्नेश मिश्रा, आजरा महाविद्यालयात पाच दिवसीय हिंदीतरभाषी हिंदी नवलेखक शिबीर उद्घाटन

 
आजरा, वृत्तसेवा : 
साहित्य हा समाजाचा आरसाच नव्हे तर परिवर्तनाचे साधन आहे. नवलेखकांनी मानवाच्या कल्याणासाठी साहित्याचे लेखन करावे. जे लेखन कराल त्याचा समाजावर प्रभाव व प्रबोधन झाले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहायक निदेशक रत्नेश मिश्रा यांनी केले. ते आजरा महाविद्यालयात पाच दिवसीय हिंदीतरभाषी हिंदी नवलेखक शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी होते. 
    
शिबिराचे समन्वयक प्रो. डॉ. अशोक बाचुळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. विकसित भारत होण्यासाठी नवलेखकांकडून अभ्यासपूर्ण लेखन होणे गरजेचे आहे असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी आभासी माध्यमातून संवाद साधतानि आपले मनोगतून व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात होत असलेल्या शिबिरातून नवलेखक तयार व्हावेत असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात अशोकअण्णा चराटी यांनी केले.
      
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्याम नंदन (बिहार) व डॉ. महेंद्र ठाकूरदास (पुणे),  एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, संचालक विजयकुमार पाटील, कृष्णा येसणे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी - पाटील, प्राचार्य प्रो. डॉ. अशोक सादळे, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, सल्लागार इराण्णा पाटील, अर्जुन भुईंबर, दिलीप भालेराव यासह केरळ, गोवा, महाराष्ट्र, बिहार या राज्यातून आलेले नवलेखक विद्यार्थी उपस्थित होते. आभार संजीवनी कांबळे यांनी मानले.
=======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...